पुणे: राज्यात नवीन महाविकास आघाडी निर्माण झाली असून उद्या शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. २० वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होत आहे. तसेच स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.