ओतूर (प्रतिनिधी) – नगर कल्याण महामार्गावरील ‘श्रावणी टायर्स’ हे कोळमाथा येथिल दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले असून, दुकानातील टायर्स व पहाने असे काही सामान चोरट्यांनी लंपास केले आहे.
ही घटना बुधवारी (दि.२७) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, चोरीचा हा सर्व दुकानातील सी.सी.टि.व्ही कॅमेरामध्ये मध्ये कैद झाला आहे.
याबाबत दुकानमालक महेश पाडेकर यांनी ओतूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक परशुराम कांबळे हे करित आहेत.