लखनौ : रहकेम काॅर्नवालच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडिजने अफगाणिस्तानचा पहिला डावात १८७ धावांवर रोखले आहे. रहकेम काॅर्नवाल सर्वाधिक ७ गडी बाद करत सर्वोत्तम कामगिरी केली.
West Indies bowl Afghanistan out for 187!
Rahkeem Cornwall the star with the ball taking 7/75 🙌 pic.twitter.com/phzjTpsOfP
— ICC (@ICC) November 27, 2019
नाणेफेक जिंकून वेस्टइंडिजने अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. रहकेम काॅर्नवालने इब्राहिम जदरानला १७ धावांवर जेसन होल्डरकरवी झेलबाद करत पहिला झटका दिला. त्यानंतर जावेद अहमदी आणि इहसानुल्लाह यांनी संघाचा डाव सावरला.
त्यांनी दुस-या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी केली, पण जोमेल वाॅरिकनने अहमदीला ३९ वर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर अफसर जजई ३२, आमिर हमजा ३४ आणि इहसानुल्लाह २४ यांच्याशिवाय एकही फलंदाज मैदानावर जास्त काळ टिकू शकला नाही आणि अफगाणिस्तानचा पहिला डाव १८७ धावसंख्येवर आटोपला.
वेस्टइंडिजकडून रहकेम काॅर्नवालने २५.३ षटकांत ७५ धावा देत सर्वाधिक ७ गडी बाद केले. तर जेसन होल्डरने २ आणि जोमेल वाॅरिकनने १ गडी बाद केला.