शिरुर – टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे मुंबई वरून आलेल्या एका 58 वर्षीय पुरुषा चा कोरोनाव्हायरस अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व टाकळीहाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे.
टाकळी हाजी साबळेवाडी येथे 3 जून रोजी पाचजण मुंबई येथून आले होते. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु यामधील 58 वर्षीय पुरुषाला 10 जून रोजी त्रास होऊ लागल्याने त्याला टाकळ्याची प्राथमिक रुग्णालयाच्या वतीने औंध येथे तपासणीसाठी पाठवले होते.
तेथे त्याची कोरणा तपासणी करता नमुने घेतले असता काल 11 जून रात्री उशिरा 58 वर्षे पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती टाकळीहाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे.