Sanjay Raut on Abhishek Ghosalkar – दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर बेछूट गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा या इसमाने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्या असून त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर दहिसर येथील करुणा रुग्णालयात उपचार सुरु होते.
महाराष्ट्रात गुंडा राज!
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच
वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला!
फडणविस… pic.twitter.com/px2scxZ4jV— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या घटनेचा ठाकरे गटातील नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी हे सरकारचे अपयश असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गुंडा राज!
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच
वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला!
फडणविस… pic.twitter.com/px2scxZ4jV— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2024
अशात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर शेअर करत टीका केली आहे, या फोटोत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर बेछूट गोळीबार करणार मॉरिस नोरोन्हा ही शिंदेंना हात जोडतांना दिसत आहे. हा फोटो शेअर करत संजय राऊत यांनी ट्विट केले आहे की,’महाराष्ट्रात गुंडा राज! अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मोरिश narohna चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता.मुख्यमंत्री त्याला भेटले. मोरीश याला शिंदे सेनेत येण्याचे आमंत्रण दिले!(वर्षा बंगला गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय)आज त्यानें अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला! फडणविस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी! राजीनामा द्या!’ असेही लिहिले आहे.