Abhishek Ghosalkar : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबारकरून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना फेसबुक लाईव्ह दरम्यान घडली आहे. त्यासोबतच त्यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नरोन्हा यानेदेखील स्वतःला संपवले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी आता गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात आठवड्याभरात गोळीबाराचे हे दुसरे प्रकरण समोर आल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची माहिती गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची माहिती देखील गृहमंत्र्यांनी घेतल्याचं समोर येतंय.
गुरूवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती समजत आहे, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या प्रकरणानंतर विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.
अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.