शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीवेळी कार्यकत्यांमध्ये हाणामारी

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ‘शरद पवार’ यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, बैठीक सुरु होण्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.

हा सर्व राडा राष्ट्रवादीच्या मुख्यालयाबाहेर घडून आला त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.

परभणी मतदारसंघातील गंगाखेडच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला आणि नंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. लोकसभा निवडणुकीत परभणीमध्ये पक्षाच्या उमेदवाराचा नेमका कुणामुळे पराभव झाला, या मुद्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.