‘मी तुझीच रे’च्या प्रोमोमुळे आकर्षण वाढले

प्रथम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या हिरो-हिरोईनची आणखी एक कथा आता मराठी सिरीयलमधून येते आहे. एकमेकांचे पक्के हाडवैरी असलेली जोडी नंतर प्रेमात पडते हा मराठीचा सक्‍सेसफुल फॉर्म्युला आहे. “मी तुझीच रे’ या नव्या सिरीयलमधून हाच फॉर्म्युला दिसणार आहे. 24 जूनपासून रिलीज होणाऱ्या या सिरीयलमध्ये संग्राम साळवी आणि अमृता देशमुख ही नवी जोडी दिसणार आहे. हिरो आणि हिरोईन एकमेकांच्या विरोधात आहेत, हे प्रोमोमधून दिसते आहे. त्यामुळे पहिल्या काही महिन्यांमध्ये या सिरीयलमध्ये यांचीच कॅट फाईट बघायला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.