डिजिटल प्लॅटफॉर्मवर नशीब आजमावणारे स्टार

सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरचे नवीन ट्रेन्ड एकदम जोरात चालले आहेत. अनेक वेबसिरीज सध्या चालू आहेत. त्यातून अनेक नवीन कलाकारही या छोट्या पडद्यावर झळकायला लागले आहेत. बॉलिवूडमध्ये फारसे न चाललेल्या कलाकारांनीही आता डिजिटल वर्ल्डमध्ये काम शोधायला सुरुवात केली आहे. अशा कलाकारांचा हा एक आलेख.

तुषार कपूरने अनेक सिनेमांमध्ये काम केले, पण तो ना रोमॅंटिक हिरो म्हणून हिट झाला आणि ऍक्‍शन हिरो म्हणावे अशी त्याची पर्सनॅलिटीही नाही. त्याला फक्‍त कॉमेडी सिनेमांमध्येच चान्स मिळाला होता. लवकरच तो ऑल्ट बालाजीवर रिलीज होणाऱ्या हॉरर कॉमेडी “बू सबकी फटेगी’ या वेब सिरीजमधून पदार्पण करणार आहे. सेक्‍सी रोल व्यतिरिक्‍त बॉलिवूडमध्ये विशेष काही न करता आलेली मल्लिका शेरावत देखील “बू सबकी फटेगी’मध्ये तुषार कपूर बरोबर असणार आहे.

“कमांडो 2’मधील हॉट ऍक्‍ट्रेस अदा शर्मालाही डिजिटल मीडियाचा मोह झाला आहे. ती आता “मोह’या वेब सिरीजमधून आपल्या अदा दाखवणार आहे.

फिल्मी करिअरमध्ये बराच गॅप झाल्यावर बॉबी देओल नुकताच सलमानबरोबरच्या “रेस 3’मध्ये येऊन गेला. शाहरुखच्या रेड चिली एन्टरटेनमेंटच्या प्रॉडक्‍शनच्या एका वेब सिरीजमध्ये तो देखील असणार आहे.

“थ्री इडिएटस्‌’ सारख्या हिट सिनेमात आमिरबरोबर काम केलेल्या शरमन जोशीनेही ऑल्ट बालाजीच्या “बारिश’ या वेब सिरीजमधून काम करून वेब वर्ल्डमध्ये पदार्पण केले आहे.

बॉलिवूडमध्ये थंड झालेल्या अभिषेक बच्चननेही डिजिटल मीडियाचा पर्याय स्वीकारला आहे. ऍमेझॉन प्राईमवरील “ब्रीद’मध्ये माधवन आणि अमित साधच्या बरोबर त्याने केलेल्या कामाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता “ब्रीद 2’मध्ये तो पप्पा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसणार आहे. “द फायनल कॉल’मधून अर्जुन रामपालदेखील वेबसिरीजमध्ये पदार्पण करणार आहे. “आय विल गो विथ यू’ या प्रिया कुमार यांच्या कादंबरीवर ही वेब सिरीज आधारलेली आहे. तर “मिसेस सिरीयल किलर’ या वेब सिरीजमधून जॅकलीन फर्नांडिसनेही वेब सिरीजमध्ये उतरायचे ठरवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.