मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने मागील दोन दिवसांपासून मुंबईमधील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शरद पवार यांना काल संध्याकाळी डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर आणखी दोन दिवस उपचार करण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिबिरातील त्यांच्या सहभाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नसल्याची माहिती आता समोर आली. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी या संदर्भात माहिती दिली. शरद पवार यांना बरे होण्यासाठी आणखी 1 ते 2 दिवस लागतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान उद्यापासून राष्ट्रवादीचे शिबिर सुरू होणार आहे. या शिबिराला शरद पवार मार्गदर्शन करणार होते. अजूनही त्यांना पूर्णपणे बरे होण्यासाठी 2 दिवस लागणार असल्याने त्यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या वतीने 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 रोजी शिर्डी येथे “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते देखील मार्गदर्शन करणार आहेत.