बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आनंदी राहण्याचे गुपीत शेअर केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक स्कर्ट आणि ग्रे आणि व्हाईट टॉपमध्ये पोज देताना दिसत आहे.
The secret to being Happy is accepting where you are in life and making the most out of everyday ❤️ #love #gratitude #instapic #instadaily #lifeisbeautiful ❤️ pic.twitter.com/dtBrFkQtiZ
— Shamita Shetty (@ShamitaShetty) July 21, 2020
शमिताने या फोटोला कॅप्शन देत पोस्ट केले की, आपण कुठे आहोत याचा स्वीकार करून आपल्या दिवसाचा सदुपयोग करणे हे आनंदी राहण्याचे रहस्य आहे.अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राची बहीण शमिताने 2000मध्ये “मोहब्बतें’ या चित्रपटातून डेब्यू केले होते. यानंतर ती “मेरे यार की शादी है’ या चित्रपटाच्या “शरारा शरारा’ गाण्यावर थिकरताना दिसली होती.
याशिवाय शमिताने “जहर’, “फरेब’, “कॅश’ आणि “बेवफा’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.”बिग बॉस 3′, ‘”झलक दिखला जा’ आणि “फियर फॅक्टर : खतरों के खिलाड़ी 9′ यासारख्या रिऍलिटी टीव्ही शोजमध्ये अभिनेत्री दिसली आहे. “यो के हुआ ब्रो’ वेब शोमधून शमिताने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे.