पिरंगुट -मुळशी तालुक्यात आज 29 रुग्णांची नव्याने नोंद झाली. तालुक्यातील बाधितांची संख्या 429 झाली आहे. आज पिरंगुटमध्ये एक, म्हाळुंगेमध्ये तीन, सुसमध्ये दोन, उरवडेमध्ये एक, बावधनमध्ये सात, रिहेमध्ये दोन, जांबेमध्ये दोन, कासारसाईमध्ये एक तर मारुंजीमध्ये दहा रुग्ण आढळून आले.
245 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 171 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज 22 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. एकूण तेरा रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. 4 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.