Shakib Al Hasan Beaten By Bangladesh Cricket Fans : शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बांगलादेशी क्रिकेट चाहते शाकिबला मारहाण करताना दिसत आहेत. त्यालाही कॉलर पकडून ओढलेही जात आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाकिब एका शॉपिंग मॉलमधून जात असताना संतप्त जमावाने त्याच्यावर हल्ला केला. तसेच त्याला धक्काबुक्की करत खालीदेखील पाडले जाते. यानंतर काही चाहते त्याला वाचवतानाही दिसत आहेत. या हल्ल्यादरम्यान त्याला वाचवण्यासाठी ज्वेलरी शोरूममध्ये नेले जाते.
Kalesh b/w Bangladeshi Fans and Shakib al hasan, when he returned to Bangladesh after poor World Cup campaign
pic.twitter.com/C7DQK93gAk— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 21, 2023
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत शाकिबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी हे लज्जास्पद कृत्य केल्याचे युजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत. यासोबतच इतरही अनेक गोष्टी लिहिल्या जात आहेत.
व्हिडिओचे सत्य काय आहे?
व्हिडीओत जे दिसत आहे ते सत्य आहे. शाकिबला काॅलर पकडून मारहाण करण्यात आली आहे, पण ही घटना अलीकडची नाही. विश्वचषकाच्या खूप आधी हे घडले. मार्च 2023 मध्ये साकिब दुबईला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता, तेव्हा ही घटना घडली. याचा बांगलादेशच्या अलीकडच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाची कामगिरी
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा संघ शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली खेळला होता. साखळी टप्प्यातील 9 सामन्यांपैकी या संघाला फक्त दोन सामने जिंकता आले. त्यानी अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात एक विजय मिळवला, त्यानंतर शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून त्याने दुसरा विजय नोंदवला. बांगलादेश संघाच्या खराब कामगिरीचा अंदाज यावरूनच लावता येतो की, त्यांच्या संघाला नेदरलँडकडूनही पराभव पत्करावा लागला होता.
शाकिबही राहिला वादात…
विश्वचषक स्पर्धेत शाकिब अल हसनही वादात सापडला होता. संघाच्या सततच्या पराभवामुळे आणि त्याच्या बॅटमधून धावा काढता न आल्याने तो स्पर्धेदरम्यान थोडा वेळ काढून बांगलादेशला परतला. येथे बालपणीच्या प्रशिक्षकाकडून टिप्स घेऊन तो पुन्हा भारतात परतला. त्याची ही कृती सध्याच्या बांगलादेशी कोचिंग स्टाफसाठी पेच निर्माण करणारी ठरली. यानंतर तो शेवटच्या सामन्यात मैदानातही उतरला नव्हता.