madhuri dixit – 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) उद्घाटन सोहळा सोमवारी गोव्यात पार पडला. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.
यावेळी धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित (madhuri dixit) हिला भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ( IFFI 2023 ) ‘विशेष सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Veteran actress @MadhuriDixit conferred with ‘Special Recognition for Contribution to Bharatiya Cinema’ Award at the 54th International Film Festival of India.#IFFI2023 #iffigoa@MIB_India @prasarbharati @airnewsalerts @IFFIGoa@nfdcindia pic.twitter.com/lSSlvRdx4o
— Akashvani आकाशवाणी (@AkashvaniAIR) November 20, 2023
माधुरीला हा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून अभिनेत्री माधुरी दीक्षित (madhuri dixit) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
अगदी लहान वयात ‘अबोध’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या माधुरीला लोकप्रियता मिळाली ती ‘तेजाब’ या चित्रपटाने. यातील ‘एक दो तीन’ हे गाणे खुपच गाजले होते. त्यानंतर यशाने तिची पाठ सोडली नाही. माधुरीचा जन्म मुंबईत 1984 ला झाला.
अभिनेता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांची जोडी लोकप्रिय ठरली आणि दोघांनी अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले.
मात्र, 1999 मध्ये माधुरी डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.