India vs Australia WC 2023 Final Team India’s defeat celebrated in Bangladesh : विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. या पराभवामुळे टीम इंडियाचे करोडो चाहते दु:खी झाले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये बांगलादेशमध्ये भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे.
वास्तविक, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाला होता. यामध्ये भारताला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने खेळात टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण हे फार काळ होऊ शकले नाही. पराभवानंतर भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फायनलमध्ये टीम इंडियाचा 6 विकेट्सनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने विजेतेपदावर कब्जा केला.
एक्सवर (पूर्वीचे Twitter) एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये बांगलादेशच्या ढाका विद्यापीठात भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत, जे मोठ्या स्क्रीनवर सामना पाहत आहेत.
Mass Celebration of
” INDIA’S DEFEAT” in TSC, Dhaka University, Bangladesh.Thousands gathered and cheered as India lost against Australia in WC Final.
It’s not about 🇦🇺, even if Vatican city play against India 🇮🇳, Majority of us will support them. #INDvsAUS pic.twitter.com/JeyrkeQuif— 🇵🇸 🔻Sh_ak_ib🔻🇧🇩 (@sh_akib_hq) November 20, 2023
एक्सवर (पूर्वीचे Twitter) शेअर केलेला हा व्हिडिओ 60 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओ कमेंटमध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बांगलादेशातील लोक भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया देत आहेत.
“Even if a ‘Banana Tree’ play a Match against India – We’ll support it” –
Bangladeshi youth who were gathered to see INDIA’S DEFEAT vs Australia in WC 2023 Final‼️
Watch the video to see their reaction after the match! #INDvsAUSfinal pic.twitter.com/whNM26ud8M
— 🇵🇸 🔻Sh_ak_ib🔻🇧🇩 (@sh_akib_hq) November 20, 2023
ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय…
दरम्यान, या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य होती. इंडियानं सर्व 10 सामने एकतर्फी पद्धतीने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. येथे टीम इंडियाचा विजयाचा दावा मजबूत होता पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषक फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 240 धावा केल्या, जे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी 7 षटक शिल्लक असताना पूर्ण केले. कांगारू संघाने येथे 6 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेत एकही सामना न हरलेल्या भारतीय संघाला दुर्देवाने अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं अन् 12 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीस मिळालं. यानंतर आपल्याला एवढी मेहनत केल्यानंतरही वर्ल्ड कप जिंकता आला नाही याचं दु:ख भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं.