नवी दिल्ली – सोने स्मगलिंग (Gold smugling) हा प्रकार काही कस्टम आणि विमानतळ अधिकाऱ्यांसाठी नवीन नाही. नुकतंच दिल्ली विमानतळावर (Delhi Airpoert) अधिकाऱ्यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचे सोने जप्त केले.परदेशातून सोने घेऊन आलेल्या बहाद्दराने हे सोने छोट्या ज्यूस बॉक्समध्ये (juce box gold) नेण्याचा प्रयत्न केला.
मंगळवारी, सीमाशुल्क पथकाने (Customs officer) बँकॉकच्या (bankok to india gold) विमानाने आलेल्या भारतीय प्रवाशाकडून सोने जप्त केले.सीमाशुल्क विभागाच्या पथकाने दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर ही कारवाई केली. पकडण्यात आलेल्या सोन्याचे 4.204 ग्रॅम इतके वजन असलेल्या सोन्याचे किंमत तब्बल 2.24 कोटी रुपये असलयाचे समजते.
यावेळेसचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये या व्यक्तीने सोन्याचे कशाप्रकारे पॅकिंग केले होते हे पाहायला मिळते. छोट्या ज्यूस पॅकेटमध्ये अगदी एखाद्या खाद्य पदार्थाप्रमाणे पॅकिंग करण्यात आले होते. या बॉक्समधून सोने बाहेर काढण्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
#WATCH | Delhi Airport Customs have seized gold bars weighing 4.204 kgs valued at Rs 2.24 Crores brought by one Indian national from Bangkok. The pax has been arrested under the Customs Act, 1962. Further investigations are underway: Customs
(Source: Customs) pic.twitter.com/8sOpscepzN
— ANI (@ANI) November 21, 2023
विमानतळावर संशयास्पद वाटल्याने पथकाने आरोपीला थांबवून चौकशी केली. तपासादरम्यान त्याच्या बॅगेत ज्यूसची छोटी पाकिटे आढळून आली, त्यामध्ये सोन्याची अनेक बिस्किटे सापडली. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आरोपी बँकॉकहून दिल्लीला परतले होते. प्रवाशाला अटक करण्यात आली असून पथक पुढील चौकशी करत आहे.