बंगळुरू – कर्नाटकातील भाजपचे मंत्री रमेश जारकीहोली यांच्या सेक्स व्हिडीओ टेप येथील एका स्थानिक वृत्तवाहिनीवरून प्रसारीत झाल्याने भाजपपुढे नवीनच अडचण निर्माण झाली. या प्रकरणाचा राज्यभरात मोठा गवगवा झाल्याने या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
रमेश जारकीहोली हे जलसंधारण खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी एका तरूणीला सरकारी नोकरी देतो असे अमिष दाखवून तिच्यावर हा प्रकार केला.
सरकारी निवासस्थानातच त्यांनी हा प्रकार केला होता. या सेक्सचा व्हिडीओ स्थानिक वृत्त वाहिनीने जसाच्यातसा प्रसारीत केल्याने राज्यात मोठींच खळबळ उडाली. सुरवातीला या प्रकरणी काय प्रतिक्रीया द्यायची याविषयी भाजपचे प्रदेश नेते गोंधळेले होते.
या व्हिडीओची सत्यता तपासली पाहिजे अशी भूमिका भाजपने सुरूवातीला घेतली होती पण नंतर थेट जारकीहोली यांचा राजीनामाच घेण्यात आला.
या संबंधात जारकीहोली यांनी म्हटले आहे की माझ्यावर या संबंधात करण्यात आलेले आरोप खरे नाहीत. या प्रकाराची रितसर चौकशी झाली तर त्यातून सत्य बाहेर येईल. त्यात मी निरपराध असल्याचे सिद्ध होईल असे त्यांनी म्हटले आहे. तथापि आपण नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे.