नवी दिल्ली – वायुदल प्रमुख आर.के.एस.भदोरीया, श्रीलंकेच्या वायुदलाचे प्रमुख सुदर्शन पाठिराना यांच्या निमंत्रणानुसार कोलंबोत दाखल झाले.श्रीलंकेच्या वायुदलाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 मार्च रोजी श्रीलंकेच्या अध्यक्षांसमोर सादरीकरणाचा कार्यक्रम होईल.
आज झालेल्या उदघाटन समारंभाला भारतीय वायुदल प्रमुख उपस्थित राहिले. यावेळी फ्लायपास्ट आणि हवाई कसरतींचे प्रदर्शन झाले. गॅंले फेस कोलंबो येथील हवाई प्रदर्शनात सूर्यकिरण आणि सारंग तसेच तेजस एलसीए या भारतीय हवाई दलाच्या तुकडीचा हवाई प्रदर्शनात सहभाग होता. भारतीय वायुदलाच्या तुकडीचे कोलंबो येथे दिनांक 27 फेब्रुवारीला आगमन झाले. यावेळी ही तसेच गौरवशाली हवाई प्रदर्शन करण्यात येईल. दोन दशकांपूर्वी एसएलएएफच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरणचे हवाई प्रदर्शन झाले होते.
दोन दिवसांच्या या भेटी दरम्यान भारतीय हवाई दल प्रमुख विविध मान्यवर आणि श्रीलंकेच्या सशस्त्र सेनादलाच्या सेवा प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. भारतीय वायुदल आणि श्रीलंकेच्या हवाई दलाच्यात गेली काही वर्षे सातत्याने सहकारी देवाणघेवाण होत आहे. जमीन आणि हवेवरून उड्डाण, व्यावसायिक लष्करी शिक्षण, मानवी आपत्कालीन सहाय्य या क्षेत्रातील मौल्यवान अनुभवांची देवाण घेवाण करण्यासाठी नियमितपणे संवाद साधत आहेत. अलीकडच्या काळात दोन्ही देशातील वायुदलांत दोन्ही देशातील सेवा कर्मचाऱ्यांच्या आणि कुटुंबियांच्या भेटीच्या संबंधांत वाढ झाली आहे.