Madhya Pradesh Election 2023 : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा जबलपूरला पोहोचले. हिमंत बिस्वा सरमा यांनी शनिवारी (१६ सप्टेंबर) त्यांनी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हिमंत बिस्वा सरमा इंडिया अलायन्सच्या निर्णयावरून काँग्रेस वर जोरदार टीका केली.
हिमंत बिस्वा सरमा म्हणाले, “काँग्रेस ला व्यसन आहे, सेन्सॉरशिप लादणे, मीडियावर बहिष्कार घालणे, काँग्रेस चा इतिहास 1975 पासून सुरू होतो. हे नवीन नाही. त्यांची ही तालीम आहे. भारतात काँग्रेस चे सरकार आले तर , ते माध्यमांवर सेन्सॉरशिप लादतील.”
हिमंत बिस्वा सरमा पुढे म्हणाले, चंद्रावर पाठवल्याबद्दल त्यांनी काँग्रेस ला टोला लगावला आणि ते म्हणाले, ‘इस्रोने योग्य वेळी चांद्रयान बनवले ही चांगली गोष्ट आहे. त्यात बसवून संपूर्ण काँग्रेस ला चंद्रावर पाठवू. तिथे जा आणि सरकार बनवा, तिथे जा आणि बंदी घाला. हरकत नाही. ‘
अँकरच्या बहिष्काराच्या हालचालीची मुलांच्या वर्गातील वागणुकीशी तुलना करताना म्हणाले, “माझ्या लहानपणी जेव्हा जेव्हा वर्गात भांडणे व्हायची तेव्हा आम्ही कट्टी करायचो. त्याचप्रमाणे काँग्रेस मधील वातावरणही तसेच झाले. कोणाचाही चेहरा चांगला नाही. हा राजकीय पक्ष पण तो असा बालिश वागतात.”
इंडिया अलायन्सच्या मीडिया सेलच्या आभासी बैठकीत देशातील १४ प्रसिद्ध अँकरच्या कार्यक्रमांना प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस चे प्रवक्ते पवन खेडा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X च्या माध्यमातून ही माहिती दिली. यानंतर देशभरात यावर खळबळ उडाली.