नवी दिल्ली – भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) आज दिल्लीतील राऊस ऍव्हेन्यू कोर्टात हजर झाले. महिला कुस्तीपटूंच्या (wrestler) लैंगिक शोषण प्रकरणाची (Sexual harassment case) आज दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, देखरेख समितीने खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांना दोषमुक्त केलेले नाही. समितीने शिफारशी दिल्या होत्या, निर्णय नाही. दिल्ली पोलिस 23 सप्टेंबर रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा सुरू ठेवणार आहेत.
यापूर्वी 20 जुलै रोजी न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंह आणि सहायक सचिव विनोद तोमर यांना जामीन मंजूर केला होता. सुनावणीदरम्यान फिर्यादी व तक्रारदाराच्या वकिलांनी जामिनावर कोणताही आक्षेप घेतला नसून,
जामीन मंजूर करताना अटी घालण्याची विनंती केली. राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी हरजीत सिंग जसपाल यांनी हा आदेश दिला.