34 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

महापालिकेचा जानकीदेवी बजाज संस्थेच्या सहकार्यातून उपक्रम

पिंपरी – महापालिकेच्या 34 प्राथमिक शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित शाळांतील प्रत्येकी 3 शिक्षकांना सेमी इंग्रजीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जानकीदेवी बजाज विकास संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. तसेच, एकूण 63 शाळांतील शिक्षकांसाठी उपचारात्मक अध्यापन, खेळ व इतर विषयांचे (विज्ञान व गणित) प्रशिक्षणही आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी गुरुवारी दिली.

सेमी इंग्रजी शिक्षण सुरू केले जाणार असल्याने त्याचा फायदा महापालिका शाळेतील बालवाडी आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महापालिकेच्या 5 शाळांमध्ये सध्या सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. उपक्रमातंर्गत शिक्षकांना विनामुल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाचा महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीत जाणवणाऱ्या अडचणी तसेच नियोजन याबाबत चर्चा
केली जाईल. या उपक्रमाचे नियंत्रण करण्याची जबाबदारी जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडे असेल. त्यांना वर्षभरातून दोनदा प्रगतीचा अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर करावा लागणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×