नगर -अहमदनगर शहर कॉंग्रेस पक्षाचे किरण काळे यांची नगर ग्रामीण आणि नगर शहर-जिल्हा युवक कॉंग्रेस व एन. एस. यु. आयच्या “समन्वयक’पदी निवड करण्यात आली आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात सूचनेवरुन व युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. संगमनेर येथील राजहंस दूध संघांमध्ये आज काळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते काळे यांनी हे पत्र स्वीकारले.