IPL 2024 (RCB vs CSK Match 68) : आज IPL 2024 चा 68 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. करो या मरो अशा या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या आहेत. आता आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला 200 धावांच्या आत मर्यादित रोखावे लागेल.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने सलामीची जबाबदारी घेतली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची (58 चेंडू) भागीदारी करून बंगळुरूला चांगली सुरुवात करून दिली. संघाला पहिला धक्का विराट कोहलीच्या रूपाने बसला, जो 10व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मिचेल सँटनरचा बळी ठरला. कोहलीने 29 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी केली.
बेंगळुरू संघ पहिल्या विकेटमधून नीट सावरत नाही तोपर्यंत त्यांनी कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या रूपाने दुसरी विकेट गमावली. कर्णधार धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. डू प्लेसिसने 39 चेंडूंत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
यानंतर रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 (28 चेंडू) अशी भक्कम भागीदारी केली. ही भागीदारी १८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रजत पाटीदारच्या विकेटने संपली, त्याला शार्दुल ठाकूरने झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाटीदारने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 41 धावांची खेळी केली.
यानंतर 19व्या षटकातील पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिकच्या रूपाने संघाला चौथा धक्का बसला. कार्तिकने 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 14 धावा केल्या. त्यानंतर 20 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने बेंगळुरूने पाचवी विकेट गमावली, ज्याने 5 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावा केल्या. यादरम्यान, कॅमेरून ग्रीनने 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 38* धावा केल्या. अशा प्रकारे बेंगळुरूने 20 षटकात 5 विकेट गमावत 218 धावा केल्या.
चेन्नईकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने दोन तर तुषार आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.