भारतीय युवक सचिनच्या प्रेमापोटी सीमा ओलांडून पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर अडचणीत सापडली आहे. यूपी एटीएसने सलग दुसऱ्या दिवशी तीची चौकशी केली असून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. दरम्यान, सीमा हैदरचा भाऊ आणि काका पाकिस्तानी लष्करात असल्याची माहिती समोर आली आहे.
सीमाचा भाऊ पाक लष्करात : गुलाम हैदर
आता सीमा हैदरचे पहिले पाकिस्तानी पती गुलाम हैदर यांनी सीमाचा भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्याचा दावा केला आहे. गुलाम हैदरच्या म्हणण्यानुसार, सीमाचा भाऊ कराचीमध्ये तैनात होता. आसिफ असे त्याचे नाव असून सध्या आसिफने नोकरी सोडली आहे. दुसरीकडे, गुलाम हैदरने असेही सांगितले की सीमाचे काका गुलाम अकबर इस्लामाबादमध्ये आहेत आणि ते सैन्यात उच्च पदावर आहेत.
सीमाने घरातून पळून जाऊन लग्न केले होते –
एटीएसच्या चौकशीत आणखी बरीच माहिती समोर आली आहे. सीमाने पाकिस्तानी प्राधिकरणाला एक प्रतिज्ञापत्र दिले होते ज्यात तिने तिच्या पालकांना लोभी असल्याचे सांगितले होते. त्यात सीमाने म्हटले होते की, माझे आई-वडील लोभी आहेत, त्यामुळे ते माझे लग्न एका भटक्या मुलाशी लावत आहेत. त्यामुळे तिने घरातून पळून जाऊन गुलाम हैदरशी लग्न केल्याचेही सीमाने त्यात सांगितले होते. गुलाम हैदर आपल्याला खुश ठेवतील असे तीला वाटले.
सीमा हैदरची दुसऱ्या दिवशीही चौकशी –
त्याचबरोबर आतापर्यंतच्या चौकशीत एटीएस सीमाने केलेल्या सर्व वक्तव्यांची खातरजमा करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून सत्य बाहेर येईल. सोमवारी एटीएसच्या नोएडा युनिटने सीमा सेक्टर 94 मधील कंट्रोल अँड कमांड सेटरमध्ये सचिन मीणा आणि त्याचे वडील नेत्रपाल यांची सुमारे 8 तास चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा सीमा हैदरची एटीएस कार्यालयात चौकशी करण्यात आली असून त्याचे नेतृत्व एटीएसचे एसएसपी करत आहेत.
एटीएसच्या चौकशीदरम्यान सीमा हैदरच्या पाकिस्तानी ओळखपत्राचीही चौकशी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सीमा हैदरची तिच्या ओळखपत्राबाबत चौकशी करत आहे. सीमा हैदरचे ओळखपत्र 20 सप्टेंबर 2022 रोजी जारी करण्यात आले. अधिकारी सीमा हैदरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की तिला पाकिस्तानी नागरिकत्व ओळखपत्र इतक्या उशिरा का मिळाले. तर अशी ओळखपत्रे जन्माच्यावेळीच बनवली जातात.
सीमाची यापूर्वीही भारतीय मुलांशी बातचीत –
चौकशीदरम्यान सीमा हैदरने असे अनेक खुलासे केले आहेत जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सीमाने अधिका-यांना सांगितले की, सचिन हा पहिला भारतीय नाही ज्याच्याशी तिने संवाद साधला. याआधीही सीमा हैदरने दिल्ली-एनसीआरमधील अनेक तरुणांशी फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा केली होती. एटीएस अधिकाऱ्यांनाही सीमा हैदरच्या आत्मविश्वासावर आणि सडेतोड उत्तरांवर शंका आहे. ती न थांबता उत्तर देते.