नवी दिल्ली – पाकिस्तानी सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकथेवर बनत असलेल्या “कराची ते नोएडा’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.
निर्माते अमित जानी यांचे वकील विनायक पाटील यांनी रिट याचिका दाखल केली आहे. अमित जानी जानी फायरफॉक्सच्या बॅनरखाली सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर कराची ते नोएडा हा चित्रपट बनवत आहेत. भरत सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाबाबत मनसेकडून सातत्याने धमक्या येत आहेत. चित्रपटाच्या घोषणेवरून मुंबईत सुरू झालेला वाद पाहता ही रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
बिग बॉसमध्ये येणार सीमा-सचिन
लवकरच सीमा-सचिन यांची जोडी प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.
सीमा हैदरने सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे शोमध्ये ऑफर मिळाल्याबद्दल सांगितले आहे. तिने असेही सांगितले की, तिला सध्या शोमध्ये जाण्याची इच्छा नाही. जर ते बिग बॉसमध्ये सहभागी झाले तर या प्रकरणाची माहिती मीडिया आणि लोकांना नक्कीच दिली जाईल. असं ती म्हणाली. मात्र, या दोघांनीही आपण सध्या कोणत्याही शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितल्याची माहिती समोर येत आहे.