पाकिस्तनातून भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच सीमा हैदरवर नवा चित्रपट येणार असल्याची घोषणा झाली होती. ‘कराची टू नोएडा’ असं सिनेमाचं नाव आहे. निर्माते अमित जानी हा चित्रपट बनवणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. याशिवाय त्यांनी या चित्रपटातील पहिलं गाणं देखील लवकरच रिलीज होणार असल्याचे ट्वीटद्वारे सांगितले आहे.
‘कराची टू नोएडा’ या सिनेमात मॉडेल फरहीन फलक ही सीमा हैदरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे भरत सिंह दिग्दर्शक आहेत. कराची टू नोएडा सिनेमाचं पहिलं गाणं ‘चल पडे है हम’ 20 तारखेला रिलीज होणार आहे. पोस्टरमध्ये मॉडेल फरहीन फलकचे तीन लुक दाखवण्यात आले आहेत. एका लुकमध्ये तिने हिजाब घातलेला आहे, दुसऱ्या लुकमध्ये ती साडीत दिसते आहे तर तिसऱ्या लुकमध्ये ती संकटात असल्याचे दाखवले आहे. पोस्टरमध्ये फरहीन सीमा हैदरसारखीच दिसत आहे.
Song will release on 20 August
Poster launched
Jani Firefox Films
Director- Bharat Singh
Producer- Amit Jani
Lyrics- Amit Jani
Singer- Preeti Saroj
Actress- Farheen falak
Creatives- Saurav Shaan Yadav, Aditya Raghav pic.twitter.com/du5EuHgkQt— Amit Jani (@AmitJaniIND) August 17, 2023
दरम्यान, सीमा आणि सचिन यांची प्रेमकहाणी फारच आगळीवेगळी आहे. पबजी गेम खेळताना या दोघांमध्ये मैत्री झाली होती. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सचिनवरील प्रेमासाठीच सीमा पाकिस्तानची सीमा पार करुन भारतात आली. मात्र ती जासूस असल्याचा संशय आल्याने तिची चौकशी सुरु झाली. सीमा चार मुलांची आई असून सगळं सोडून ती लपूनछपून पाकिस्तानातून भारतात आली. त्यानंतर सचिन आणि सीमाने लग्न केले ते एकत्र राहू लागले. काही दिवसांनंतर हा प्रकार समोर आल्यानंतर हे दोघे कायद्याच्या कचाट्यात सापडले.