आंबेठाण – करोना सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावामध्ये होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महिनाभरापासून गावातील ग्रामसुरक्षा दलातील तरुण गावाच्या सिमेसह गावात तळ ठोकून आहे. गावातील वर्दळीच्या ठिकाणी दिवसरात्र बसून गावामध्ये कुठल्याही नवीन माणसाला प्रवेश देण्याआधी त्याची चौकशी केली जात आहे. तो कुठून आला कुठे जाणार या सर्व गोष्टीची खातरजमा केल्यानंतरच त्याला प्रवेश दिला जातो. त्याचे तापमान मोजले जाते. त्याची सर्व प्रकारची माहिती संग्रहित केली जात आहे.
माध्यमातून या सर्व तरुणांना स्वयंसेवक पास, टी-शर्ट, टोपी, सॅनिटायझर व करोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन काळात विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरू नये भाजी मार्केट किराणा दुकान यासारख्या जीवनावश्यक सेवा मिळणाऱ्या ठिकाणी गर्दी होऊ नये सोशल डिस्टन्सचे नियम पाळावेत. सर्वांनी मास घालूनच घराबाहेर पडावे यासाठी गावातील स्वयंसेवक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.
नागरिकांना योग्य त्या सूचना तसेच गरजूंना जेवण तसेच नागरिकांच्या अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न या स्वयंसेवकां मार्फत केला जात आहे. दिवसभर रखरखत्या उन्हात स्वयंसेवक पहारा देतात तर रात्रीच्या अंधारात गावामध्ये चोरीचा प्रकार होऊ नये यासाठी गस्त सुद्धा घालत असून त्यांना पोलीस, ग्रामपंचायत, महसूल, आरोग्य प्रशासन, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाची जोड लाभली आहे.