बेल्हे – बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी करोना बद्दल केली जनजागृती.
बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करोना – कोविड-१९ या आजारावर नागरिकांमध्ये जनजागृती केली. करोना होऊ नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहीजे तसेच कोणकोणते उपाय आखले पाहीजे याविषयीची घर बसल्या पोष्टर बनवुन व्हाँटसप फेसबुक द्वारे जनजागृती केली आहे.
घरीच रहा, सुरक्षित रहा,आनंदी रहा, सोशल डिस्टन्स पाळा, शासकीय नियमांचं पालन करून शासनाला सहकार्य करा, आपल्याला सर्वाना मिळून करोनाशी सामना करायचा आहे, करोना ला हरवायच आहे,करोना होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची असे विविध पोस्टर या विद्यार्थ्यांनी बनवले तसेच डॉक्टर,नर्स, पोलीस यांसह सर्व अत्यावश्यक सेवा पूरवणार्यांना या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्या कार्याला सलाम केला आहे.
इयत्ता दहावीचा वर्ष आहे या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे हे विदयार्थी घरीच अभ्यास पूर्ण करत आहेत. आपण लवकर या करोनाच्या संकटातून बरे होऊ अशी आशा या विद्यार्थ्यांनी केली आहे.आपला देश,राज्य करोनाच्या संकटातून लवकर बाहेर पडू दे अस साकडं या विद्यार्थ्यांनी देवाला घातलं आहे.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.