सीमारेषेवरून सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडले

नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार कुरापती करणे सुरू आहे. त्यातच आता दोन्ही देशांच्या सीमारेषेवरून पाककडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र पाकचा हा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलाने हाणून पाडला आहे.

सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमा भागातील एका संशयिताला पकडले आहे. हा संशयित व्यक्‍ती भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, बीएसएफने त्याला ताब्यात घेतले. या व्यक्तीला अखनूर सेक्‍टरमधून पकडले गेले आहे. संशयितास बीएसएफने तपासासाठी जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.