युवा संगीतकारांसाठी मिळणार शिष्यवृत्ती

पुणे – नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्टस्‌ एनसीपीए आणि सिटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संगीतकारांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हिंदुस्थानी संगीताच्या गायकी, ख्याल, द्रुपद, मेलडी, सतार, सरोद, व्हायोलिन, बासरी, हार्मोनियमच्या अद्ययावत प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. 18 ते 35 वर्षे वयोगटातील कलाकार यासाठी अर्ज करू शकतात. 31 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. इच्छुकांनी आपली माहिती ncpascholarships@gmail.com या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.