वाई – २२ यार्ड क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने सुरु केलेल्या अद्ययावत क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे वाई तालुक्यात चांगले क्रिकेटपटू घडतील, असे गाैरवोदगार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.
वाई व्यायाम शाळा व २२ यार्ड क्रिकेट ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वाई व्यायाम शाळेच्या मैदानावर अद्ययावत क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राचे उदघाटनआमदार मकरंद पाटील, रणजी क्रिकेटपटू अफझल पठाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट खेळाडू कुमारी तेजश्री ननावरे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी नगरसेवक भारत दादा खामकर, गाेपाळ भंडारी, सुनील बनकर, अरूण देव, नंदकुमार चव्हाण, पत्रकार विश्वास पवार, सचिन शिंदे उपस्थित हाेते.
आ. पाटील पुढे म्हणाले, वाई शहरात महाराष्ट्र रणजी खेळणारे क्रिकेटपटू अफझल पठाण हे सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने आणि चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडु आहेत. अशा खेळाडुंचे मार्गदर्शन या केंद्रात लाभल्यामुळे तालुक्यातुन चांगले खेळाडू तयार होऊन क्रिकेट मध्ये आपला ठसा उमटवतील.
या केंद्राला प्रशिक्षक म्हणून शिरीष जाधव व नजीर बागवान म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमास वाई व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी, सोशल क्रिकेट क्लब वाईचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित हाेते.