कामेरी – पत्रकार हे समाजाचे डोळे असून सक्षम समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी पत्रकारांची महत्वाची भूमिका असते समाजातील प्रश्न लेखनीच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणण्यासाठी महत्वाची भूमिका पत्रकार बांधव करत असतात असते, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. नागठाणे भाग पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कार वितरण व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम , कराड उत्तर भाजपा नेते मनोज घोरपडे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, डाँ. अरूणा बर्गे, चंद्रकांत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू शेळके, भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे, पं. स. सदस्य संजय घोरपडे , पृथ्वीराज निकम, सदस्य प्रविण धस्के, जयवंत कुंभार, राजे प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष संतोष घाडगे, अजिंक्यतारा कारखाना संचालक सुनील निकम, माथाडी कामगार संघटना अध्यक्ष संजय निकम, भरत देशमुख, महेश घाडगे, अंजली जाधव, उद्योजक सयाजी चव्हाण, नितीन साळुंखे, रविंद्र ढाणे, पोलीस पाटील संघटना जिल्हाध्यक्ष रमेश जाधव तसेच स.पो.नि. सागर वाघ, सपोनि रवींद्र तेलतुंबडे, सपोनि अभिजित यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
खासदार भोसले यांनी पत्रकारांसाठी सुसज्ज सातारामध्ये पत्रकार भवन उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
धैर्यशील कदम म्हणाले, सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी नागठाणे पत्रकार संघाचे सदस्य नेहमीच प्रयत्नशील असतात पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
मनोज घोरपडे म्हणाले, नागठाणे पत्रकार संघातील सर्व पत्रकार हे सर्वसामान्य कुटुंबातील असून अत्यंत प्रामाणिकपणे ते आपले काम समाजासमोर मांडत असतात. संघटनेच्या वतीने यापुढे ही अशीच विधायक कामे यापुढेही सुरु रहावीत. आपण नेहमीच सोबत आहोत.
यावेळी संतोष कणसे, चंद्रकांत जाधव, सुनील काटकर, प्रविण धस्के ,राजू शेळके, यांनी मनोगते व्यक्त केली.
सुनील शेडगे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी पुरस्कार वितरण करण्यात आले शिक्षणक्षेत्र, महेंद्र निकम ,उद्योग भुषण ज्ञानेश्वर गायकवाड, आरोग्य सेवा डॉ. अनिल पवार, अध्यात्मसेवा ब्रम्हकुमारी सुवर्णा दिदी, युवा उद्योजक अनिल घाडगे, कृषि संतोष काळभोर, पत्रकारिता चंद्रकांत चिंचकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .तसेच विद्यार्थी,स्पर्धा परीक्षामध्ये निवड झालेले अधिकारी यांचा ही गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला विविध गावचे सरपंच, व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र कणसे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष धनाजी कणसे यांनी आभार मानले.