कराड – सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या शुभारंभाची सभा पाल, ता. कराड येथील मारुती मंदिरासमोरील पटांगणात सोमवार, दि. 22 रोजी दु. 4.30 वाजता होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील यांनी दिली.
या सभेस माजी सहकार व पणन मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील, आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, हर्षद कदम, डॉ. सुरेश जाधव, अजितराव पाटील-चिखलीकर), श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, अॅड. रवींद्र पवार आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, श्रमिक मुक्ती दल, शेकाप, आम आदमी पक्ष व इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवराज पाटील यांनी केले आहे.