महाबळेश्वर – महाबळेश्वर शहरात शनिवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास झालेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत असून, स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. महाबळेश्वरमध्ये दुपारी तापमान 33 अंश तर रात्री 22 अंश सेल्सियसपर्यंत असल्याने, उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी मुख्य बरापेठेतील अनेक व्यापार्यांनी ग्रीन नेटचे मंडप घातले आहेत.
मात्र, शनिवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने जवळपास एक तास जोरदार बॅटिंग केल्याने, महाबळेश्वरवासीयांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. या पावसामुळे हवेत काही वेळ गारवा निर्माण झाला होता.