फलटण – मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिसूचना जारी केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याबद्दल फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजबांधवांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पेढे आणि साखर वाटप करण्यात आले.
मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य राज्य सरकारने केल्याची बातमी समजताच सकल मराठा समाजबांधव आणि भगिनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने एकत्र आल्या. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डीजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना पेढे आणि साखर वाटून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.