वाई – वाई येथे शनिवार दि. 18 रोजी मनोज जरांगे-पाटील यांची मराठा आरक्षणाबाबत सभा होणार असून प्रशानाच्यावतीने सभेपूर्वी आढावा घेण्यात आला आहे. अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी सभा स्थळ, वाहतूक व पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. तसेच मराठा समाज समन्वय समिती बरोबर बैठक घेतली. यावेळी दलाल यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
यावेळी पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णराव पवार, गोपणीय विभागाचे भरत जाधव, नेवसे, दुदुस्कर तसेच मराठा समाज समन्वय समितीचे पदाधीकारी यावेळी उपस्थित होते.
ही सभा छत्रपती शिवाजी महाराज चौक बांधकाम विभाग कार्यालयासमोर होणार आहे.सभेच्या नियोजनाकरिता वाई येथील सकल मराठा क्रांती मोर्चा वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मराठा समाजाने या सभेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अपर पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांनी सभा स्थळ, वाहतूक व पार्किंगची पाहणी करून काही सुचनाही यावेळी दलाल यांनी दिल्या.
====================