पाचगणी (प्रतिनिधी) – ‘स्वच्छ भारत नागरी अभियान 2023’मध्ये पाचगणी नगरपरिषदेस पश्चिम विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने नवी दिल्ली येथील भारत मंडपम्मध्ये गुरुवार, दि. 11 रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. यासाठी पाचगणी नगरपरिषदेस निमंत्रित करण्यात आले आहे.
गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवले जाते. या अभियानात केंद्र सरकारने नियुक्त केलेले पथक वेगवेगळ्या निकषांनुसार सर्वेक्षण करते. त्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विभागनिहाय पारितोषिके दिली जातात.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’मधील यशाबद्दल मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील नागरिक, स्वच्छता कर्मचारी आणि पालिकेच्या सर्व कर्मचार्यांचे आभार मानले.