कोरेगाव – महायुती सरकारने आमदार महेश शिंदे यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून, कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिला आहे. आमदार शिंदे यांचे बुधवारी दुपारी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आगमन झाल्यावर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
कोरेगाव येथील सातारा जकात नाका येथे ना. महेश शिंदे यांचे दुपारी आगमन झाले. कोरेगाव विकास आघाडी, आमदार महेशदादा शिंदे विचारमंच, नगरपंचायत, साहेब युवा मंच आणि अन्य संस्थांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सजवलेल्या जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिवतीर्थ रोटरी उद्यान हुतात्मा स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ना. शिंदे यांनी अभिवादन केले. त्यांचा विविध संस्था आणि संघटनांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे, ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे, सदस्य दीपक कांबळे,
नगराध्यक्ष दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सचिन बर्गे, सागर वीरकर, सागर बर्गे, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्ना काझी, माजी नगरसेवक बच्चू ओसवाल, रशीद शेख, संतोष बर्गे, दीपक कांबळे, डॉ. विघ्नेश बर्गे, सागर दोशी, अनिकेत सूर्यवंशी, बाबा दुबळे, विजय घोरपडे, अजित विलासराव बर्गे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काटकर अजित तुपे, रत्नदीप फाळके, जवानसिंग घोरपडे, शिवसेना शहरप्रमुख महेश शामराव बर्गे, दीपक फाळके आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी केली.
जुना मोटर स्टँड येथे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि बाजार समितीचे संचालक सुनील निदान, लिंगायत समाज बांधवांच्यावतीने आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने श्रीमती शिवानी बहेनजी यांनी ना. शिंदे यांचे स्वागत केले. कुमठे फाटा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकात भाजपच्यावतीने आदित्य गवळी भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. वडाचीवाडी, रामोशीवाडी, भाटमवाडी, चिमणगाव फाटा येथेही ना. शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.