इंदापूर -राज्यातील इतर बाजार समितीपेक्षा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व जाती धर्मांना, सर्व राजकीय पक्षांना, सर्व गटातटांना एकत्र करून, कारभार आदर्शवत करते. तसेच संचालक बोर्डामध्ये सर्व घटकांना कोणताही पक्ष न बघता संधी दिली जाते. सर्वपक्षीय नेत्यांची कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम पुणे जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे मार्गदर्शक आप्पासाहेब जगदाळे करीत आहेत. असे गौरवोद्गार आमदार यशवंत माने यांनी काढले.
इंदापूर कृषी इंदापूर बाजार समिती आयोजित कृषी जनावरे प्रदर्शन घोडेबाजार घोडेबाजार डॉग शो याचा प्रारंभ बुधवारी (दि. 24) मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंतराव माने यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप होते. तर घोडेबाजाराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते पार पडले. ऑलिंपिक प्रात्यक्षिक प्रारंभ नीरा भीमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद् घाटन इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार यशवंतराव माने बोलत होते.
उपस्थितांचे स्वागत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे तसेच बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर यांनी केले. यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, आदर्श उद्योजक वसंतराव मोहोळकर, नीरा-भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, माजी सभापती विलासराव वाघमोडे, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, अर्जुन देसाई, मारुत्ती पाटील, शिवसेना नेते विशाल बोंद्रे यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान बाजार समितीच्या वतीने विशेष पुरस्कार देऊन करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक व बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकर्यांचा व सर्वच क्षेत्रात तालुक्यातील सामान्य नागरिकांनी जी प्रगती केली आहे. त्यांचा सन्मान बाजार समितीने केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी जबाबदारी वाढलेली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रेय फरतडे यांनी केले. रोहित मोहोळकर यांनी आभार मानले.
“आदर्श शेतकर्यांनी आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीची पिके घेऊन उत्पन्न काढावे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी आरोग्य सेवा देण्याचे काम केले आहे. त्यांनी अनेक रुग्णांना असेच उपचार द्यावेत. आदर्श शिक्षकांनी आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम करावे, आदर्श पत्रकारिता तसेच आदर्श विधीतज्ञ यांनी जनतेची अधिक सेवा करावी.” -आप्पासाहेब जगदाळे, संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक