कोरेगाव – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शांततेच्या मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोरेगावमध्ये तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. रोटरी उद्यानातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आला. तेथून मराठा समाजबांधव घोषणाबाजी करत तहसील कार्यालयासमोर पोहोचले. तेथे मंडपात साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
सी. आर. बर्गे, सुधाकर बर्गे, अनिल जाधव-रोमण, जीवन जाधव, पृथ्वीराज बर्गे, राजेश बर्गे, अशोक भोसले, पोपटराव भिलारे, अर्जुन भोसले, नितीन बर्गे, आनंदराव बर्गे, नितीन प्रतापराव बर्गे, दिलीप कदम, राहुल शशिकांत बर्गे, सागर संभाजी बर्गे, अधिक बर्गे, संग्राम बर्गे, विक्रम बर्गे, वैभव पोळ, नितीन विलासराव बर्गे, अमोल तानाजी बर्गे, कुमार शिंदे उपस्थित होते. पृथ्वीराज बर्गे, अशोक भोसले, हृषिकेश फडतरे व ऍड. नंदकुमार कांबळे यांनी साखळी उपोषणाबाबत भूमिका मांडली. कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन बर्गे, अजितविलासराव बर्गे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.