कराड -कंत्राटी नोकर भरतीचा अद्यादेश काढणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, “आपला नातू तुपाशी, दुसऱ्याची पोरं उपाशी’, अशा घोषणा देत भाजपच्यावतीने कंत्राटी पद भरतीच्या अध्यादेशाचा निषेध नोंदवण्यात आला.
येथील दत्त चौकात भाजपच्यावतीने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीचा निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर, रामकृष्ण वेताळ, धनाजी पाटील, महिला आघाडीच्या कविता कचरे, स्वाती पिसाळ, सीमा घाडगे, सारिका गावडे, दिपाली खोत, सुदर्शन पाटसकर, सुहास जगताप, शंकर पाटील, प्रमोद शिंदे, दिलीप जाधव आदींची उपस्थिती होती.