आज पदाधिकाऱ्यांच्या निवडी; मतदारसंघात ताकत वाढणार
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सुचनेनुसार सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात पक्षाची मजबूत बांधणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी सातारा – जावळीत मतदारसंघात लक्ष घातले असून सोमवारी (दि. ७) सातारा येथे सातारा – जावळी मतदारसंघाच्या पदाधिकारी निवडी होणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाइक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाइक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मतदार संघ निहाय नियोजन करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात प्रत्येक मतदारसंघात पदाधिकारी निवडी करण्यात येत असून त्यानंतर मतदारसंघनिहाय मेळावे घेण्यात येणार आहेत. सातारा – जावळी मतदारसंघातील विविध पदासाठी इच्छुकांची चाचपणी करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी सातारा येथील अयोध्या अपार्टमेंट, कुबेर गणपती शेजारी येथे पदाधिकारी निवडी होणार आहेत, अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी दिली.
सोमवारी सातारा-जावळी मतदारसंघातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाइक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार असून या निवडी झाल्यानंतर मतदारसंघात पक्ष आणखी बळकट होइल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा मोठा गट जिल्ह्यात कार्यरत असून आगामी काळात पक्ष आणखी मजबूत झालेला दिसेल. सातारा – जावळी मतदार संघात पक्षाची चांगली ताकत असून आगामी काळात मतदारसंघात राष्ट्रवादीचे वादळ दिसणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची जिल्ह्यात मजबूत बांधणी आहे.
– अमित कदम ( जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)