सातारा – शेंद्रे, ता. सातारा येथील अभयसिंहराजे भोसले पॉलिटेक्निक महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण संत उत्साहात संपन्न झाला. स्नेहसंमेलनाचे उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे हस्ते झाले.
स्नेहसंमेलनात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेचे सादरीकरण केले. अँड टेलिकम्युनिकेशन च्या विद्यार्थ्यांनी आईचा जोगवा, माहिती तंत्रज्ञानच्या विध्यार्थ्यानी भारतीय संस्कृतीतील सर्व सण व त्यांचे महत्व तर, मेकॅनिक विभागातील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव, विठ्ठल आणि आषाढी एकादशी, वारी यांचे सादरीकरण केले. यशस्वी विध्यार्थ्यांना अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सुरेश शिंगटे, डांगे सर, सावंत सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
प्रा. ए. डी. काझी, पी.एम. कुलकर्णी, सौ. ए. इ. गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. सौ. व्ही. एस. सुतार यांनी कार्यक्रमाचे नियिजन केले. यावेळी प्राचार्य एस.यु. धुमाळ, उपप्राचार्य आर. डी. नलवडे, कार्यालय अधीक्षक एस.एस. भोसले यांच्यासह विध्यार्थी आणि पालक उपस्थित होते.