सातारा – साताऱ्यातील बोरखळ येथे बैलगाडा शर्यतीदरम्यान एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुष्कर पवार असे या मुलाचे नाव आहे. दोन बैलगाडीची धडक होवून अपघात झाला आणि बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने या मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येते आहे.
या मुलाचा मृतदेह साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. या शर्यतीसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.