सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतील आणि करोना केअर सेंटरमधून बुधवारी संध्याकाळपर्यंत 511 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर 725 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 80, कराड 18, फलटण उपजिल्हा रुग्णालय 34, कोरेगाव 31, वाई 57, खंडाळा 47, रायगाव 59, पानमळेवाडी 164, मायणी 11, महाबळेश्वर 22, दहिवडी 18, खावली 21, तळमावले 47, म्हसवड 39, पिंपोडा 10 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 67 अशा एकूण 725 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.