Jammu & Kashmir Heavy Rainfall| जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. येथे बर्फवृष्टीदरम्यान हिमस्खलन झाला आहे. याच दरम्यान पुंछमधील मंडी भागातील बेदार गावात भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. तसेच किश्तवाड भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. येथील हिमस्खलनाचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.
किश्तवाडमधील कचोन गावात भूस्खलनामुळे प्राथमिक शाळेसह घरांचे मोठं नुकसान झाले. डोडा, किश्तवाड आणि कुपवाडा जिल्ह्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उधमपूर जिल्ह्यातील डूडू-बसंतगड, कुलवंता आणि पंचारी भागात शाळा बंद राहणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. Jammu & Kashmir Heavy Rainfall|
#WATCH जम्मू-कश्मीर: पुंछ के मंडी इलाके के बेदार गांव में भूस्खलन के कारण कई घर क्षतिग्रस्त हुए। pic.twitter.com/dUK1bkptNl
— ANI_HindiNews (@AHindinews) April 30, 2024
रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी अचानक पूर आला. हंदवाडा आणि कुपवाडा जिल्ह्यांसह उत्तर काश्मीरमध्ये अनेक निवासी घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. याप्रकरणी पर्वतीय भागात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे, तर झेलम नदी सामान्य पातळीपेक्षा जास्त वेगाने वाहत आहे. Jammu & Kashmir Heavy Rainfall|
गेल्या 72 तासांत झालेल्या पावसामुळे काश्मीरमधील सर्व नद्या, तलाव आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागातील गुरेझ खोऱ्यात बर्फवृष्टी झाली. यानंतर अधिकाऱ्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये हीच परिस्थिती कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
हेही वाचा:
“हा माणूस काय वेडा झाला आहे का? ” ; चंद्रकांत खैरेंचा व्हिडिओ दाखवत शिंदे गटाच्या नेत्याची टीका