सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिला. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी मिळून देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. पंडीत राठोड यांनी व्यक्त केला.
समाजातर्फे उदयनराजे भोसले यांना भेटून जाहीर पाठिंबा दिला आहे. सातारा जिल्ह्यात बंजारा समाजाचे 50 हजारहून अधिक मतदार असून राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पाठिंब्यामुळे उदयनराजे यांचा विजय निश्चित होईल याची खात्री मानली जात आहे.
यावेळी अँड.पंडीत राठोड, अनिल नाईक यांनी उदयनराजेना पाठिंबाचे पत्र देऊन सन्मान केला. महाराज साहेबांनी मी बंजारा समाजाच्या सोबत असून गोर बोली भाषाला मान्यता प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहून गोर बंजारा समाजाला वेगवेगळ्या समिती स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये स्थान मिळून देऊ, तांड्या मध्ये विकासाची गंगा पोहचवू, असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले.
यावेळी प्रदेश प्रवक्ता अमोल पवार, कार्याध्यक्ष अनिल नाईक , ग्रामपंचायत सदस्य नामदेव राठोड, धर्मराज राठोड, शिवाजी राठोड, मोहन राठोड, नाना राठोड, सुनील चव्हाण, संदीप राठोड यांच्या सह सातारा लोकसभा मतदार संघातील बंजारा समाजाचे प्रमुख नेते व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.