Sanjay Shirast on Chandrakant Khaire। लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार झाले आहेत. या दोन्ही टप्यांसाठी सर्व पक्षांनी जीवाचं रान करून प्रचार केला. दरम्यान, आता येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. संभाजीनगर मतदारसंघात तिहेरी लढत होत आहे. त्यातच शिंदेंच्या शिवसेनेतील सर्वच नेते भुमरे यांचा प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान, खैरे यांना लक्ष्य केलं जातंय. आमदार संजय शिरसाट यांनी तर खैरे यांची एक व्हिडीओ क्लीप दाखवून त्यांच्यावर सडकून टीका केली.
संजय शिरसाट एका सभेला संबोधित करताना चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत खैरे काही लोकांशी संवाद साधताना दिसतायत. याच व्हिडीओचा आधार घेत शिरसाट यांनी खैरे यांच्यावर निशाणा साधला.
हा माणूस काय वेडा झाला आहे का? Sanjay Shirast on Chandrakant Khaire।
काही लोकांनी 50 खोक्यांचा आरोप केला. ते काही-बाही बोलत होते. त्यांची भाषा कशी बदलली हे तुम्ही पाहिलं आहे का? आता खाण-बाण काहीही नाही. आता माझ्याकडे एक व्हिडीओ क्लीप आली आहे. ती क्लीप पाहून मला प्रश्न पडला की हा माणूस काय वेडा झाला आहे का? या माणसाला नेमकं काय झालंय? मला ही क्लीप कोणीतरी पाठवली आहे, असं शिरसाट म्हणाले.
तुमचे कालचे शब्द आज कुठे गेले? Sanjay Shirast on Chandrakant Khaire।
व्हिडीओ दाखवून झाल्यानंतर शिरसाट यांनी मिश्कील विधान केले. गर्व से कहो हम हिंदू है, आवाज कोणाचा? चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना रॅली काढली होती. ती रॅली तुम्ही पाहिली का? तुम्ही व्हॉट्सअॅपवर आहात, फेसबुकवर असाल. आपण या व्हिडीओला काहीही केलेलं नाही. त्यांनीच हा व्हिडीओ टाकला आहे. हा व्हिडीओ आपला आहे का? त्यांचाच आहे हा व्हिडीओ. हे किती वाईट आहे. तुम्ही याआधी केलेली विधाने, तुमचे शब्द आज कुठे गेली आहेत, असे प्रश्नही संजय शिरसाट यांनी केले.