Prajwal Revanna On Asaduddin Owaisi| माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे कुटुंब एका कथित सेक्स स्कँडलमध्ये अडकले आहे. देवेगौडा यांचा आमदार मुलगा एचडी रेवन्ना आणि खासदार नातू प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध लैंगिक छळ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरकाम करणाऱ्या मोलकरणीच्या तक्रारीवरून हा एफआयआर होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व काही माहित असूनही त्यांनी रेवण्णांचा प्रचार केला,’ असल्याचा आरोप ओवीसी यांनी केला आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी? Prajwal Revanna On Asaduddin Owaisi|
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंगळसूत्रावर बोलू नका. हाथरसमध्ये दलित मुलीवर बलात्कार करणारा व्यक्ती भाजपचा होता. जम्मूमध्ये असिफावर बलात्कार करणारी व्यक्ती भाजपची होती, गुजरातमध्ये बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्यांना सोडून देण्यात आले. प्रज्वल रेवण्णाने कर्नाटकात दोन हजार व्हिडिओ बनवले. यामध्ये घरकाम करणारी महिला, ७० वर्षीय महिला, पोलिस अधिकारी आणि टीव्ही अँकर यांच्या व्हिडिओंसह अनेक व्हिडिओंचा समावेश आहे.
ते पुढे म्हणाले, “तुम्ही हे विसरलात की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही मते मागत आहात त्या व्यक्तीने महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. पीएम मोदी महिला शक्तीबद्दल बोलत आहेत आणि मी मुस्लिम महिलांचा भाऊ असल्याचे सांगत आहेत. माफ करा, पण आम्हाला असा भाऊ नको आहे. प्रज्वल रेवन्ना अशी कामे करतात हे पंतप्रधान मोदींना माहीत होते, हे आश्चर्यकारक आहे. यानंतरही पीएम मोदींनी रेवण्णांसाठी मते मागितली.”
असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, भाजपने ते काय करतील ते सांगावे. उद्या ते म्हणतील की त्यांना निलंबित करण्यात आले, पण पंतप्रधान मोदींनी अशा व्यक्तीसाठी मते कशी मागितली हा प्रश्न आहे. त्यांची जेडीएससोबत युती आहे. प्रज्वल रेवन्ना जर्मनीला कसा पळून गेला ते सांगा. रेवण्णाचे नाव अब्दुल असते तर वाहिनीने गदारोळ माजवला असता.
दरम्यान, एचडी रेवन्ना हे होलेनरसीपूरचे जनता दल (सेक्युलर) आमदार आहेत. दरम्यान, त्यांचा मुलगा प्रज्वल हसन या मतदारसंघातून लोकसभा खासदार आहे. प्रज्वल यावेळीही हसनमधून निवडणूक लढवत आहेत. येथे 26 एप्रिल रोजी मतदान झाले आहे.