Sarfaraz Khan – देशात सध्या रणजी करंडक स्पर्धा सुरु असून मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान धावांचा पाऊसच पाडतोय. त्याने आपल्या दमदार खेळीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरा बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. मुंबईचा सरफराज यावेळी भारताच्या कसोटी संघात नक्कीच स्थान मिळवेल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, यावेळीही त्याला संधी देण्यात आलेली नाही.
टी-२० संघातून पुन्हा एकदा रोहित, विराटचा पत्ता कट; बीसीसीआयने नेमकं ठरवलंय काय?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या क्रिकेटमधील कौशल्याने छाप सोडणारा सरफराज भारतीय संघात अजूनही स्थान मिळवू शकलेला नाही. त्याच्यानंतर कित्येक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून संघात स्थान मिळवले. मात्र, इकडे सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत असताना देखील त्याला संधी दिली जात नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. तसे पहिले तर सूर्यकुमार यादवपेक्षा सरफराजची देशांतर्गत कसोटी क्रिकेटमधील कामगिरी कित्येक पटीने वरचढ आहे. मात्र, सूर्यकुमारला टी-२०, एकदिवसीय आता कसोटी संघामध्येही स्थान मिळाले आहे.
Why did the Indian Team not Include Sarfraz Khan and Surya Kumar Yad included in Test Squad. Stas in First class cricket#INDvsAUS #INDvsNZ #SuryakumarYadav #sarfrazkhan pic.twitter.com/5nuxsLgTf3
— Cricket News (@cricketnews1232) January 14, 2023
महिला क्रिकेटपटूच्या मृत्यूने खळबळ; झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
त्याचबरोबर भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी ईशान किशनला संघात निवडण्यात आले आहे. त्यामुळे दोन-तीन वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पाडत असलेल्या सरफराजला न्याय मिळणार की त्याच्यावर असाच अन्याय केला जाईल हे पाहणे महत्वाचे आहे. मागील एक-दोन नव्हे तर सलग तीन वर्षांपासून त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने कामगिरी केली आहे.
सातत्त्याने दमदार कामगिरी
सरफराज खानची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी पहिली तर, त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाही या गोष्टीचे तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सरफराजची आतापर्यंतची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी ८०.४७ राहिली आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम प्रथम श्रेणी सरासरीच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रॅडमन ९५.१४ च्या सरासरीने पहिल्या क्रमांकावर आहेत. सरफराजने ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३३८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १२ शतके आणि ९ अर्धशतके झळकावली आहेत, असे असतानाही त्याला संधी न मिळणे अनेकांना खटकले आहे.
Sarfraz khan is hare @BCCI https://t.co/VPGnNvbCOJ pic.twitter.com/ojTARRDnOo
— Azaharuddin Hashmi (@AzaharuddinHas1) January 14, 2023
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ
भारत – रोहित शर्मा ( कर्णधार) , लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.